जिजाऊ महाविद्यालय..सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देणे सुरु..!
B.Com. & B.Sc. प्रथम वर्षाचे प्रवेश ΝΕΡ-2020 नुसार सुरु ..!
जिजाई चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित जिजाऊ महाविद्यालय राशिन, ता.कर्जत, जि.अ.नगर- ४१४४०३
B.Com. & B.Sc. प्रथम वर्षाचे प्रवेश ΝΕΡ-2020 नुसार सुरु ..!
मर्यादित प्रवेश……….
वाणिज्य व व्यवस्थापन (B.Com.):
B.Com किंवा बॅचलर ऑफ कॉमर्स हा तीन वर्षांचा UG पदवी अभ्यासक्रम आहे जो विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यताप्राप्त आहे. वाणिज्य शाखेच्या १२वी पदवीधरांमध्ये बी.कॉम हा सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रम आहे.
. प्रवेश पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी (एच. एच. सी.) परीक्षा इंग्रजी विषयासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा परीक्षेशी समकक्ष म्हणून दुसऱ्या शिक्षण मंडळाची किंवा पुणे विद्यापीठाने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास प्रथम वर्ष वाणिज्य (एफ. वाय. बी. कॉम.) या वर्गात प्रवेश मिळेल. मात्र त्याच वर्गात रिपीटर किंवा नापास झालेल्यांना प्रवेश मिळणार नाही.
विषय निवडीसंबंधी –
-
इंग्रजी
-
मराठी
-
हिंदी
-
इंग्रजी
-
मराठी
-
अर्थशास्त्र
-
कंप्यूटर प्रोग्रामिंग अँड अँप्लिकेशन
-
फायनान्शिअल अकाउंटिंग
-
बिजनेस स्टैटिक्स
विज्ञान व तंत्रज्ञान (B.Sc.):
प्रवेश पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी (एच. एच. सी.) ची अथवा समकक्ष म्हणून पुणे विद्यापीठाने मान्यता दिलेली परीक्षा विद्यार्थ्याने जर इंग्रजी व (१) भौतिक शास्त्र (२) रसायनशास्त्र (३) जीवशास्त्र (४) गणित (५) भूगोल इत्यादी शास्त्र विषयांपैकी तीन विषय घेतले असतील तरच त्या विद्यार्थ्याला प्रथम वर्ष विज्ञान (एफ.वाय.बी.एस्सी.) या वर्गात प्रवेश मिळेल, मात्र त्याच वर्गात रिपीटर किंवा नापास झालेल्ययांना प्रवेश मिळणार नाही.
विषय निवडीसंबंधी –
- इंग्रजी
- मराठी
- फिजिक्स
- केमिस्ट्री
- मॅथेमॅटिक्स
- झुलॉजी
- बॉटनी
- मायक्रोबायोलॉजी
- वाइन टेक्नॉलजी
- जिओग्राफी
– महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:
- महाविद्यालयाची भव्य इमारत व रमणिय परिसर.
- समृध्द ग्रंथालय,
- पुस्तकपेडी व अभ्यासिकेची सोय.
- विज्ञान शाखेसाठी सुसज्ज प्रयोग शाळेची सोय.
- भव्य क्रिडांगण समृध्द जिमखाना विभाग.
- महाविद्यालयातील गरीब, गरजु, गुणवंत, होतकरु विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजनेची सोय.
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन योजना व राष्ट्रीय सेवा योजना.
- अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग.
- विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन,
- जादा तासीका घेऊन त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न.
- पात्र विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या व शुल्क सवलती मिळवुन देण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते.
- कॉम्प्युटर क्लासेसची सुविधा.
- दरवर्षी विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन.
- माजी विद्यार्थी विद्यार्थीनी मेळावा.
- इंग्लिश स्पीकींग क्लासची सोय व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन.
- गोर गरिब विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना.
प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
१) १२ वी गुणपत्रक
२) शाळा सोडल्याचा मूळ दाखला व झेरॉक्स
३) जात प्रमाणपत्र
४) आधार कार्ड झेरॉक्स
५) गॅप असेल त्यांनी गॅप असलेल्या शैक्षणिक वर्षाचे गॅप सर्टिफिकट
६) प्रवेशासाठी येताना मूळ कागदपत्रांबरोबर प्रत्येकी दोन झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.
७) उत्पन्नाचा दाखला (तहसील कार्यालयाने दिलेला) स्कॉलरशीपसाठी आवश्यक आहे, त्यासाठी तयार करून ठेवावा.
८) पात्रता फॉर्म
९) अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
अधिक माहितीसाठी संपर्क:
संस्था कार्यालय: 9975189881 फोन : 9421586881/9970374999