B.Sc Agriculture Admission:’कृषी’ प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर…….
MISSION ADMISSION :१५ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज; पहिली यादी २७ जुलैला
असे असणार वेळापत्रक:
- केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड : ४ जुलै
- अंतरिम गुणवत्ता यादी : १९ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- यादीवर हकरत व तक्रार नोंदणी : २० ते २२ जुलै
- तक्रारींची यादी प्रसिद्ध: २३ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : २४ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- पहिली प्रवेश यादी: २७ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोटिंगचा कालावधी: २८ ते ३० जुलै (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- दुसऱ्या फेरीची यादी : २ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी: ३ ते ५ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- तिसऱ्या फेरीची यादी जाहीर : ८ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : ९ ते ११ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- महाविद्यालयात कागदपत्रे व आवश्यक शुल्क भरण्याचा कालावधी : ९ ते १२ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- केद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर : १३ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- महाविद्यालयस्तरावर प्रवेश फेरी: २३ ते २६ ऑगस्ट वर्ग सुरु होणार : १६ ऑगस्ट प्रवेश प्रक्रिया संपणार : २६ ऑगस्ट
बी. एस्सी ऑग्रीकल्चर, बी. एस्सी (हॉर्टिकल्चर), बी. एस्सी (फॉरेस्ट्री), बी. एफ. एस्सी (फिशरी), बी. टेक (फूड टेक्नोलॉजी), बी. टेक (बायो टेक्नोलॉजी), बी. टेक (अॅमग्रीकल्चर इंजिनियरिंग), बी.एस्सी कम्युनिटी सायन्स, बी. एस्सी अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट या नऊ शाखांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यंदा कृषी अभ्यासक्रमाचे तीन अनुदानित तर एक विनाअनुदानित असे चार नवे महाविद्यालय सुरू करण्यात आल्याने३७७ जागा वाढल्या आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये या सर्व अभ्यासक्रमांना मिळून राज्यामध्ये २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा आहेत. यामध्ये ४७ शासकीय तर १५६ खासगी महाविद्यालये आहेत.
शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६८६ जागा तर खासगी महाविद्यालयांत १४ हजार २४० जागा आहेत. या जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार १५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर होणार असून पहिल्या प्रवेश फेरीची यादी २७ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरी प्रवेश फेरी २ ऑगस्ट रोजी होणार आहे. प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. यानंतर केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी १६ ते २१ ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली