Dada Patil College: दादा पाटील महाविद्यालय ‘कर्मज्योती या नियतकालिकास विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

0 50

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी प्रकाशित केलेल्या नियतकालिकांची स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते. रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय ‘कर्मज्योती या नियतकालिकास विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. (Dada Patil College’s magazine ‘Karmajyoti’ won the second prize at the departmental level)

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये दादा पाटील महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले.

दादा पाटील महाविद्यालयाचे (Dada Patil College) प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, कर्मज्योतीचे संपादक प्रा. भास्कर मोरे तसेच डॉ. आनंद हिप्परकर, डॉ. संदीप पै यांनी सदर पारितोषिक स्वीकारलेमहाराष्ट्र हे भारत देशातील आघाडीवर असणारे राज्य आहे. महाराष्ट्राला खूप मोठी ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, साहित्यिक, वैज्ञानिक व राजकीय परंपरा लाभली आहे. या मातीत अनेक विभूती जन्माला आलेल्या आहेत. या विभूर्तीचे महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ज्यांचे विचार, कर्तृत्व व संशोधन हे इतरांसाठी दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक ठरले आहे अशा मान्यवरांवरती विद्यार्थ्यांकडून लेखन मागविले आणि त्यातूनच ‘कर्मज्योती’ हे वार्षिक नियतकालिक आकाराला आलेले आहे.

विद्यार्थ्यांच्या लेखणीला उत्तेजन मिळावे, युवा वर्गाची वैचारिक मशागत व्हावी, त्यांच्यातून सुसंस्कृत नवोदित लेखक, कवी उद्यास यावेत तसेच विद्यार्थ्यांमधून उद्योजक, संशोधक निर्माण व्हावेत या दृष्टीने महाविद्यालयामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जीवन म्हणजे विचारसंपन्नतेचा सुवर्णकाळ असतो. अशा विद्यार्थ्यांच्या लेखणीतूनच अवतीर्ण झालेले लेखन म्हणजे ‘कर्मज्योती’ नियतकालिकात अवतीर्ण झालेले लेखन होय.

सदर नियतकालिकास विद्यापीठाचा पुरस्कार  प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी संपादक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.